वणी उपविभागातील तिन्ही ठाणेदारांची बदली.......

•तिन्ही हेव्हिवेट ठाणे रिक्त, अब किसकी नजर?

अजय कंडेवार,वणी:- जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी शनिवारी वणी उपविभागातील तब्बल तिन्ही ठाणेदारांचा बदल्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांचे खांदेपालट केले आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यात शिरपुरचे ठाणेदार API संजय राठोड यांची बदली अमरावती ग्रामीण मध्ये करण्यात आली तर मारेगाव येथील ठाणेदार API जनार्दन खंडेराव यांना वाशिम येथे तर पाटण ठाणेदार API संदीप पाटील यांची बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील Shocking बदल्या म्हणून बोलल्या जात आहे.

लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणुक आयोग, मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांनी संदर्भीय निर्देशानुसार आणि निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अमरावती परीक्षेत्रांतर्गत सहा.पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेणे करिता दि.२४/०२/२०२४ रोजी परीक्षेत्रीय आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

त्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम-२२ न, पोट कलम (२) अन्वये परीक्षेत्र स्तरावतील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती परीक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळ यांनी खालील सहा. पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे.