PSI 'साजिद'ची जुनी शैली Reutrn....
Vidarbh News | Ajay Wani :- वणी शहरात अवैध दारूच्या धंद्यांनी पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वणी पोलिसांनी आपला खाकीचा धाक कायम असल्याचे दाखवून दिले आहे. पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि PSI साजिद खान यांच्या पुढाकाराने सोमवारी सकाळी राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दीपक चौपाटी परिसरात पोलिसांनी सापळा रचत हॅरिअर वाहन अडविले आणि अवैध दारू वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आणला. विशेषता वनी शहरामध्ये अशा प्रकारची गोम आहे की Sajid ची शैली पुन्हा वापस आली आणि आणखी काही मोठी कार्यवाही शक्यता होऊ शकते असंही शहरात बोलल्या जात आहे.
कारवाईदरम्यान भारत प्रमोद टोंगे (रा. शिंदोला, ता. वणी) याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या हॅरिअर वाहनातून विविध कंपन्यांच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे दुचाकीची तपासणी केली असता सुमित उदयभान जुंगे (वय 19) व त्याचा सहकारी शुभम अनंता वाघमारे (दोघेही रा. लालगुडा, वणी) यांच्या ताब्यातूनही अवैध दारूचा साठा आढळून आला. या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये वाहनांसह तब्बल 20 लाख 13 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पी आय भानुदास पितुरकर यांनी सर्व अधिकाऱ्यांचे हात खोलल्यानंतर म्हणजेच मुभा दिल्यानंतर अवैध धंद्यांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत वणी पोलिसांकडून दिले जात होते. सोमवारी झालेल्या या कारवाईतून त्याची प्रचिती आली. कायद्याला आव्हान देणाऱ्यांवर कोणतीही दया दाखविली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे. पीएसआय साजिद खान व त्यांच्या पथकाच्या सतर्कतेमुळे दारू तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला .