"इथून वसुली एजंट' करतोय व्याज बट्याचा धंदा......?
Desk By - Vidharbh News
Vidarbh News,Wani:- शहरामध्ये अशा प्रकारची चर्चा आहे की एक कर्मचारी "इथून वसुलीएजंट" अनेकांकडून वसुली करत सगळ्यांचे माया जमा करत आपला पोट धंदा सुरू केल्याच म्हटलं जात आहे विशेषता विचित्र समोर येत आहे की "तो इथून "व्याज बट्ट्याचा धंदा सुद्धा करत असल्याची माहिती समोर येत आहे सूत्रांकडून माहिती मिळाली आणि मिळालेली आहे की हा खूप मोठा आहे आणि स्वतः "तो इथून"असा दाखवतो की मी या एका भैयाचा "चाटु" आहे असा दाखवत भैया भैया करीत लक्ष्मीदर्शनाने मोठी "माया" जमविली आहे. परंतु हा एवढा चतुर आहे की एकाच्या नावाने तर म्हणतो की ,"मी याचा माणूस आहे मी त्याचा माणूस आहे" मला कोणीच काही म्हणू शकत नाही .मी फक्त "वसुली" करू शकतो मला साहेब सुद्धा काहीं म्हणू शकत नाही, असा "इथून वसुली एजंट " नेहमी कर्मचाऱ्यांमध्ये ठसणीने अशी शहरांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे.
दरम्यान, स्थानिक काही कर्मचाऱ्यांमध्येही या विषयावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. संबंधित व्यक्तीचा वाढता प्रभाव आणि त्यामागील कारणे याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.