निष्ठावान"जय आबड"काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी....
जयकुमार आबड हे काँग्रेस पक्षातील निष्ठावान,पक्षनिष्ठ युवक म्हणून त्यांची ओळख. उच्च शिक्षण घेऊन ही समाजकारण व राजकारणाची आवड असल्याने त्यांनी पदार्पण केले. यांचा विशेष ख्याती दरम्यान काँग्रेस पक्ष संघटन तळागळात वाढवण्यासाठी अतिशय तळमळीने निष्ठेने काम करत; नेहमी कार्यकर्ते जोडत ; स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे "जय आबड " यांची काँग्रेस वणी शहर अध्यक्ष पदी वर्णी लागल्याने शहरातील राजकारण व समाजकारणातील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.त्यांचा या निवडीने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
• वणीत काँग्रेस हळू हळू कात टाकतंय
वणी तालुका काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ता म्हणून "जय "ची विशेष ओळख आहे .हे मागील अनेक वर्षापासून काँग्रेसच्या संघटन वाढीसाठी काम करत आहेत. अनेक दिग्गजांचा यांच्या नेतृत्वाच पक्षाने कात टाकून नव्याने उभारी घेतल्याचे दिसते. अशात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी शहरात काँग्रेस पक्ष जोराने कंबर कसताना दिसत असून आपली छाप आगामी निवडणूकीत पाडून दाखवेल असे दिसत आहे.