फुटपाथ विक्रेत्यावर 353 सारखं गंभीर गुन्हा दाखल.....
Vidarbh News AJAY :- वणी शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी फुटपाथवरील कपडे विक्रेते संजय भगत यांच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक भोलेश्वर नारायण ताराचंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, 19 जून रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज परिसरात नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी सहाय्यक पथक प्रमुख म्हणून काम पाहत असलेले भोलेश्वर ताराचंद व इतर कर्मचारी अतिक्रमित साहित्य हटवत असताना संजय भगत यांनी कारवाईला विरोध केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, नगर परिषद कर्मचाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला तसेच जप्त करण्यात येत असलेले साहित्य ट्रॅक्टरमधून खाली फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर भोलेश्वर ताराचंद यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संजय भगत यांच्याविरुद्ध BNS कलम 132, 315(2), 352, 351(1) व 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.