स्वंयघोषित राजेंची ‘चाटुगींरी’ करणारा "तो पोम्याडिंग्या "?
Desk By - Vidharbh News
Vidarbh News,AJAY:- राजकीय वर्तुळात सध्या एका व्यक्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. एकेकाळी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारा ‘"तो पोम्याडिंग्या "आता 'रंगीला स्वंयघोषित नेता राजे' यांच्या इतका जवळ गेल्याचे दिसत आहे की, आधी "विश्वासाकरिता" खूप "भाऊ भाऊ" म्हणून 'चाटूगिरी केली .आता तर 'राजेची 'गोष्ट आली की, जिथे तिथे हाच 'पोम्याडिंग्या 'चाटूगिरीसाठी "उभाच" असतो असे चित्र निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. राजेचं नाव आलं की स्वतः पुढे पुढे सुद्धा करतो अशी सुद्धा त्यांची चर्चा आहे.
सध्या हा 'पोम्याडिंग्या 'यांचे एकच धोरण आहे भाऊ"जिधर दम, उधर हम" म्हणजे जिथे राजकीय वजन आणि पद जिकडे जास्तमोठ, तिथेच आपली उपस्थिती. काल कोणाच्या बाजूला होता आणि आज कोणाच्या बाजूला आहेत, हे कधी कधी त्यांनाच आठवत नसेल,अशी मिश्कील टिप्पणीही काही जण करताना दिसतात.विशेष म्हणजे, राजेंच्या आणि एका नेत्याचा प्रत्येक वक्तव्याला "वा साहेब, काय विचार आहे . मग चला कागद फिरवू'", प्रत्येक निर्णयाला "साहेब, तुम्ही तर कमाल केली अस तस" आणि प्रत्येक कार्यक्रमाला "साहेब, तुमच्यासारखा नेता नाही हो" असे म्हणण्याची "त्या वकटवाण्या चातुगिरीची"शैली आता सर्वांनाच परिचित झाली असल्याचे बोलले जाते.
या "पोम्याडिंग्या"ची राजकीय कारकीर्द दोन गोष्टींवर जास्त चालते. एक म्हणजे मोठमोठ्या बाता मारणे आणि दुसरे म्हणजे 'चाटुगींरी 'करून कागद फिरवणे. इकडचा कागद तिकडे, तिकडचा कागद इकडे आणि त्या कामालाच मोठे आंदोलन किंवा मोठी कामगिरी म्हणून सादर करण्याची 'चाटुगींरी आणि हुजुरीगिरी कला' असल्याचे विनोदाने सांगितले जाते.याहून गंमतीची बाब म्हणजे, स्वतःला ते राजकारणातील मोठा 'तोफखाना ' समजतात. मात्र विरोधक तर सोडाच, त्यांच्या जवळच्या लोकांमध्येही अशी चर्चा आहे की, तोफखान्यापेक्षा त्यांची 'चाटुगिरीची तोफ 'जास्त धडाडताना दिसते.भाऊ, भैया भोवती फिरणे, त्यांचे कौतुक करणे, त्यांच्यासोबत फोटो काढणे आणि संधी मिळेल तेथे त्यांची स्तुती करणे, हेच जणू त्यांचे मुख्य राजकीय कर्तव्य बनले आहे.
एकेकाळी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारे 'पोम्याडिंग्या ' आता स्वतःचा राजकीय मार्ग शोधण्याऐवजी राजेंच्या सावलीतच सुखी असल्याचे दिसत असल्याची कुजबुज आहे. त्यामुळे शहरात आता मिश्कीलपणे एक नवी म्हण ऐकायला मिळत आहे."नेतेगिरी कमी... हुजुरीगिरी जास्त.