संजय देखमुखला वणीत येऊ द्या,कानाखाली वाजवू......
Desk By - Vidharbh News
Vidarbh News,AJAY : उबाठा शिवसेना पक्षातील फुटीनंतर राज्यभर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आता वणीतही उमटू लागले आहेत. शिवसेना (उबाठा) चे यवतमाळ-वाशिमचे खासदार Sanjay Deshmukh यांच्या कथित बंडखोरीच्या चर्चेनंतर उबाठा गटात तीव्र नाराजी व्यक्त होत असून कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षनिष्ठेला तडा देणाऱ्या कोणालाही माफ केले जाणार नाही, अशी भावना उबाठा गटातील संजय निखाडे यांनी व्यक्त केली. आम्ही ठाकरेचे एकनिष्ठ आहोत आणि राहणार असेही ते बोलले.
या पार्श्वभूमीवर वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष Sanjay Nikhade यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली. "त्या संजय देशमुख ला वणीत येऊ द्या, कानाखाली वाजवू," असे वक्तव्य करत त्यांनी कथित बंडखोरीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून उबाठा गट बंडखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, निखाडे यांच्या या प्रहारक भूमिकेमुळे वातावरण वणीत तापले.पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा संयम आता संपत चालल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळत असून बंडखोरी करणाऱ्यांना राजकीय धडा शिकवण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.