Vidarbh News, Ajay Wani :-
वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली २९ जून रोजी वणी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर व औषधी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा जनसामान्यांच्या दारी पोहोचविण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.जैताई मंदिर परिसरात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात जनरल फिजिशियन, शस्त्रक्रिया तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोग तपासणी व उपचार, कान-नाक-घसा विकार, अस्थिरोग, स्त्रीरोग तसेच त्वचारोग आदी विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. याशिवाय पात्र रुग्णांना मोफत औषधे व आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शनही दिले जाणार असून, नेत्र तपासणीनंतर गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनात शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिराचा लाभ वणी, मारेगाव, झरी तसेच परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

शुभम गोरे (७९७२२८४२३८), राहुल पारखी (९१६९४६१६१६) यांना संपर्क साधावे.