अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील राजुर कॉ येथील अभिमन्यू येसांबरे यांचा लहान मुलगा प्रशांत अभिमन्यू येसांबरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवार ता.25 रोजी प्रशांत याची प्राणज्योत मालवली. 

प्रशांत अभिमन्यू येसांबरे (28) रा. राजूर वॉर्ड क्र.4 याच्यावर काही दिवसांपासून नागपूर येथे उपचार सुरू होते . गेल्या आठवड्यात प्रकृती अस्वस्थतेमुळे ते नागपूर येथे भरती करण्यात आले होते. दरम्यान त्याला शारीरिक काही त्रास होत असल्याने त्याला नागपूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली