ओबीसी व बहुजन समाजाला सरकारने आश्वस्त करावे : डॉ. अशोक जीवतोडे
Desk By - Vidharbh News
Wani:- ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी समाज एक होऊन आज (दि.२८) ला गांधी चौक, चंद्रपूर ते जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर पर्यंत महामोर्चा काढण्यात आला.
या महामोर्चाची दखल घेऊन केंद्र सरकारने एससी-एसटी प्रमाणे ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी जनगणनेच्या पुढील टप्प्यात ओबीसी समाजाचा कॉलम ठेवावा तथा महाराष्ट्र सरकार द्वारा आरक्षित प्रवर्गाच्या हितावर परिणाम करणारा कॅबिनेट मंत्रिमंडळाने १४ मे २०२६ ला घेतलेला निर्णय रद्द करावा, व ओबीसी तथा बहुजन समाजाला आश्वस्त करावे, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
आपल्या हक्कांसाठी, आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा मोर्चा आयोजित होता.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, राष्ट्रीय महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे तथा एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजाचे प्रतिष्ठित नेते उपस्थित होते.महामोर्चात विदर्भातून मोठ्या संख्येने बहुजन समाज सहभागी झाला होता.