Vidarbh News,Wani:-वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या काही काळात शिंदे सेनेच्या संघटनात्मक बळकटीमागे ज्यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे, ते म्हणजे जिल्हा संघटक विजय चोरडिया. शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी पक्ष संघटनेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.वणी शहरासह ग्रामीण भागात पक्षाची मुळे अधिक घट्ट करण्यासाठी विजय चोरडिया यांनी सातत्याने प्रयत्न सातत्याने करत आहेत. कार्यकर्त्यांशी थेट संवाद, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय आणि संघटन विस्तारासाठी घेतलेले विविध उपक्रम यामुळे त्यांचे राजकीय वजन दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वणी शहर व परिसरात अती उत्साह शिंदे गटाकडे कल दिसत आहे. सामान्य जनतेच विजय भाऊ यांना पाहण्याच दृष्टिकोन सकारात्मक आहे.

विशेष म्हणजे, पक्षातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची शैली अनेकांना भावत आहे. त्यामुळे संघटनेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी पक्षाच्या बैठका, जनसंपर्क अभियान आणि संघटनात्मक कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद हा देखील त्यांच्या नेतृत्वशैलीचा परिणाम मानला जात आहे.

राज्यात शिंदे सेना आपली राजकीय ताकद वाढवत असताना वणी विधानसभेतही पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी विजय चोरडिया आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. विरोधकांच्या राजकीय आव्हानांना उत्तर देण्यासाठी सक्षम संघटन उभारण्याचे काम त्यांनी सातत्याने केले असून यामुळे त्यांच्याकडे पक्षातील विश्वासू आणि प्रभावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.राजकीय वर्तुळात सध्या विजय चोरडिया यांना शिंदे सेनेतील उदयोन्मुख आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख मिळत आहे. शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वाढता संपर्क, संघटनात्मक पकड आणि सर्वसमावेशक भूमिका यामुळे आगामी काळात वणीच्या राजकारणात त्यांचे महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.संघटन, सआहे.मन्वय आणि कार्यकर्त्यांचा विश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर विजय चोरडिया यांनी वणी विधानसभेत स्वतःचे स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केले असून शिंदे सेनेच्या भविष्यातील वाटचालीत त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.