"गणित-विज्ञान शिक्षक तात्काळ द्या... अन्यथा आंदोलन अटळ....
सुमारे ८५ विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी केवळ दोन शिक्षकांवर असल्याने अध्यापन व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. विशेषतः गणित आणि विज्ञान विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी संबंधित शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करून एक UGT शिक्षक आणि एक गणित-विज्ञान शिक्षक तातडीने देण्याची मागणी केली आहे.
"विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल," असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर सरपंच वर्षां राजूरकर ,उपसरपंच सचिन रासेकर,शा. स.अध्यक्ष संदीप दुमणे,अनु दूधकोहळ, रामदास बोन्डे, रामकृष्ण चंदणकर,रवींद्र राजूरकर, ममता बोरुंदिया, रेखा बोन्डे, किरण सोयाम याचा सह्या आहे.