लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांचे खांदेपालट......
Desk By - Vidharbh News
वणी उपविभागातील तिन्ही ठाणेदारांची बदली.......
तिन्ही हेव्हिवेट ठाणे रिक्त, अब किसकी नजर?
अजय कंडेवार,वणी:- जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी शनिवारी वणी उपविभागातील तब्बल तिन्ही ठाणेदारांचा बदल्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांचे खांदेपालट केले आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यात शिरपुरचे ठाणेदार API संजय राठोड यांची बदली अमरावती ग्रामीण मध्ये करण्यात आली तर मारेगाव येथील ठाणेदार API जनार्दन खंडेराव यांना वाशिम येथे तर पाटण ठाणेदार API संदीप पाटील यांची बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील Shocking बदल्या म्हणून बोलल्या जात आहे.
